मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लोकसभेत प्रस्ताव मंजूर!

नवी दिल्ली : मणिपूरचे मुख्यमंत्री वीरेन शहा यांनी 9 फेब्रुवारीला राजीनामा दिल्याने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ही राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर दोन महिन्याच्या आत संसदेत प्रस्ताव मंजूर करून घेणे आवश्यक असते, त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव संसदेत दाखल केला होता तो आवाजी मतदानाने संमत करण्यात आला.
या प्रस्तावावर लोकसभेत सुमारे 40 मिनिटे चर्चा झाली. विरोधकांच्या बाजूने आठ खासदारांनी याबाबत आपले म्हणणे मांडले .मणिपूरमध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत असे आवाहन या खासदारांनी केले. काँग्रेसचे शशी थरूर यांनी यांनी या प्रस्तावावर आपले म्हणणे मांडले. काँग्रेसने सुरुवातीपासूनच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली होती . त्यामुळे त्यांनी या प्रस्तावाला संमती दर्शवली. मणिपूरमध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता नांदावी ही अपेक्षा शशी थरूर यांनी व्यक्त केली. मणिपूरचे मुख्यमंत्री वीरेन शहा यांच्या विरुद्ध काँग्रेस पक्षाने अविश्वास ठराव दाखल करण्याची तयारी सुरू केली होती, परंतु 9 फेब्रुवारी रोजी शहा यांनी राजीनामा दिला. केंद्र सरकारने विधानसभा बरखास्त न करता राष्ट्रपती राजवट लागू केली.

राज्य सरकारच्या शस्त्रागातून 60000 शस्त्रे आणि सहा लाख पेक्षा ज्यादा दारूगोळा लुटण्यात आला, त्यामुळे मणिपूरमध्ये हिंसाचाराला मोठे खतपाणी मिळाले. मणिपूर मध्ये वांशिक संघर्ष सुरू आहे या संघर्षाबाबत तेथील दोन्ही गटाशी चर्चा केली जात आहे, यातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.