फक्त मुद्द्याचं!

3rd September 2025
कला साहित्य

सांस्कृतिक कार्यक्रमांतून संस्कृती जतन : आमदार उमा खापरे

सांस्कृतिक कार्यक्रमांतून संस्कृती जतन : आमदार उमा खापरे

चिंचवड प्राधिकरण भाजप मंडल आयोजित श्रावण महोत्सवाला प्रतिसाद
पिंपरी : हिंदू संस्कृती मध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावणात विविध धार्मिक व्रत वैकल्ये केली जातात. तसेच महिला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून निसर्ग आणि परमेश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांतून पुढच्या पिढीसाठी संस्कृती जतन करण्यासाठी मार्गदर्शन मिळते असे मत आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले.

viara vcc
viara vcc

भारतीय जनता पक्ष चिंचवड प्राधिकरण मंडलाच्या वतीने सावरकर भवन येथे श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन स्पर्धा, मंगळागौर खेळ, जेष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजपचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी आमदार अश्विनी जगताप, माजी उपमहापौर शैलजा मोरे, शर्मिला बाबर, केशव घोळवे, सलीम सीकलगार, अतुल इनामदार, अरुण थोरात, सरचिटणीस संजय मंगोडेकर, सरचिटणीस शैला मोळक, माजी पक्षनेते नामदेव ढाके, संयोजक जयदीप खापरे, राधिका बोरलीकर, दिपाली धानोरकर, नीता कुशारे, राजू बाबर, सिध्देश शिंदे, अनिरूद्ध संकपाळ आदी उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाचे उद्घाटन शैलजा मोरे, जयदीप खापरे, अनुप मोरे, सुशांत मोहिते, राधिका बोरलीकर, शर्मिला महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे
भजन स्पर्धा – प्रथम क्रमांक – गजानन भजनी मंडळ, प्राधिकरण, गायत्री भजनी मंडळ, चिंचवड;
द्वितीय क्रमांक – सुखदा भजनी मंडळ, प्राधिकरण, स्वर शांती भक्ती मंडळ, प्राधिकरण; तृतीय क्रमांक – गुरूदत्त भजनी मंडळ, देहूगाव, दत्त प्रासादिक भजनी मंडळ, प्राधिकरण;
मंगळागौर खेळ – प्रथम – शालिनी ग्रुप, व्दितीय – संस्कृती ग्रुप, तृतीय – सिद्धलक्ष्मी ग्रुप, उत्तेजनार्थ – रण रागिणी ग्रुप यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून – ज्ञानेश्वर इटकर, जगताप, विनिता जोशी, प्रविण कुरळकर, विद्या दंडवते, प्राजक्ता निफाडकर यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाचे आयोजन जयदीप खापरे, अनुप मोरे, ज्योती कानिटकर यांनी केले होते. शर्मिला महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"