वैद्यकीय तपासणीत प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांचे मध्यप्राशन!

खराडी येथील रेव्ह पार्टी
पुणे : खराडी येथील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. या अटकेमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे . त्यांना अटक केल्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मध्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे .सात पैकी कोणी अमली पदार्थाचे सेवन केलं होते का हे मात्र न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे .

27 जुलै च्या पहाटे पुण्यातील खराडी भागातील एका फ्लॅटवर ही पार्टी झाली होती मात्र पोलिसांच्या मते अशीच पार्टी 25 जुलैला देखील झाली होती असा दावा करण्यात आला आहे प्रांजल खेवलकर यांनी चार दिवसासाठी तो फ्लॅट बुक केला होता त्यामुळे पुणे पोलीस शुक्रवारी 25 जुलै ला झालेल्या पार्टीची देखील चौकशी करणार आहेत त्यासाठी त्या फ्लॅटमध्ये पार्टी झाली तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावे :- प्रांजल मनीष खेवलकर ( 41) , निखिल जेठानंद पोपटानी (35) , समीर फकीर मोहम्मद सय्यद ( 41) ,सचिन सोनाजी भोंबे ( ४२) , श्रीपाद मोहन यादव (27) , इशा देव ज्योत सिंग ( 23) , प्राची गोपाल शर्मा (22)