फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
देश विदेश

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार ‘प्रलय’ मिसाईल!

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार ‘प्रलय’ मिसाईल!

नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी भारत आपला ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे, त्यासाठी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी भारत सज्ज झाला आहे. यंदाची परेड विशेष ठरणार आहे कारण डीआरडीओचे प्रलय क्षेपणास्त्र प्रथमच कर्तव्यपथावर प्रदर्शित होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच ‘प्रलय’ मिसाईलचा समावेश करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ अर्थात संशोधन, संरक्षण आणि विकास संस्थेने तयार केले असून हे शत्रूच्या मनात धडकी भरवणारे आहे.जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱया या क्षेपणास्त्राची झलक यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आयोजित संचलनात दिसणार आहे, अशी माहिती संरक्षण सचिव राकेश कुमार सिंह यांनी दिली. यंदाच्या संचलनात स्वदेशीवर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची सुरुवात हिंदुस्थानी वाद्यांच्या वादनाने होईल. यात तब्बल 300 कलाकार सहभागी होणार असल्याचे राकेश कुमार सिंह यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"