अमित शहांची स्तुती करताना एकनाथ शिंदेंनी दिली जय गुजरातची घोषणा!

पुणे : राज्यात मराठी हिंदी असा भाषिक वाद पेटला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे आपला प्रभाव आणखी वाढावा यासाठी जय गुजरात अशी घोषणा दिली .या घोषणेमुळे आता नवीन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

पुण्यातील गुजराती समुदयाकडून उभारण्यात आलेल्या जाहिरात स्पोर्ट्स व कन्वेषण सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त अमित शहा आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर उपस्थित होते .यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची तोंड भरून स्तुती केली आणि भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली . गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीमुळे आणि नेतृत्वाने अशक्य ते शक्य करून दाखवले .त्यांनी महाराष्ट्रातील 2022 च्या सत्ता बदलाबद्दल शहा यांची तोंड भरून स्तुती केली . 2022 मध्ये राज्यात सामान्य माणसांचे सरकार आणणे गरजेचे होते .पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे माझ्यामागे पर्वतासारखे ठामपणे उभे राहिले . जेव्हा देशाच्या राज्याच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा अशी पावले उचलावी लागतात . यासाठी मी शहांचे खूप आभार मानतो .त्यांच्यामुळेच युती सरकारचे डबल इंजिन सरकार जोरात धावत आहे असे शिंदे यांनी सांगितले .
अमित शहा हे महाराष्ट्राचे जावई आहेत . त्यामुळे त्यांच्या घरात गुजराती आणि मराठी या दोन्ही भाषा आनंदाने नांदतात .महाराष्ट्र आणि गुजरात गुजरातने विकास उद्योग संस्कृतीच्या क्षेत्रात देशाला नेहमीच दिशा दाखवली असल्याचे शिंदे यांनी अभिमानाने सांगितले . त्यांनी आपले भाषण संपवताना जय महाराष्ट्र ,जय गुजरात अशी घोषणा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

