फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
विधानसभा २०२४

परीक्षेला झाली सुरुवात!

परीक्षेला झाली सुरुवात!

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : राज्याच्या विधानसभेसाठी मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. राज्यभरातल्या तब्बल चार हजार १३४ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतमोजणी येत्या २३ तारखेला होऊन निकाल जाहीर होणार आहे.

महेश लांडगे यांनीमतदानाला निघण्यापूर्वी भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचे दर्शन घेतले

राज्यभरात एकूण चार हजार १३६ उमेदवार रिंगणात असून यामध्ये ३ हजार ७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार आहेत आणि अन्य २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राज्यभरात विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडण्यास प्रारंभ केला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील उमेदवारांनी सुद्धा अगदी लवकर मतदान केले आहे आणि नागरिकांनी येऊन आवर्जून मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. मतादन केंद्रावर मोबाईल नेण्यास परवानगी नाही.

मावळचे अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला

विधानसभा निवडणूक भयमुक्त, पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पडावी, यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून सर्व हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मावळ, पिंपरी, भोसरी, चिंचवड, भोर, खेड-आळंदी हे विधानसभा मतदारसंघाचा भाग येत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून आयुक्तालय हद्दीत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान अवैधरीत्या वाहतूक करीत असलेली एक कोटी ७६ लाख १७ हजार ५१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

अजित गव्हाणे यांनी मतदानाचा हक्क बजावला

राज्यात किती मतदार
राज्यात एकूण ९ कोटी ७७ लाख ८२ हजार मतदार आहेत. यामध्ये पाच कोटी २२ हजार ७३९ पुरुष आणइ चार कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याखएरीज राज्यात ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत. तर सहा लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदार आहेत. सेना दलातील मतदार १ लाख १६ हजार १७० आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"