शिवसाई लॉजवर पोलिसांचा छापा ;मॅनेजरला अटक!

पिंपरी : आळंदी फाटा, कुरुळी येथील शिवसाई लॉज वर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिला व लॉज मॅनेजरला ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवार 19 मार्च रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिवसाई लॉज ,आळंदी फाटा, कुरुळी येथे करण्यात आली.

याप्रकरणी संदीप लक्ष्मण दोडके (वय 40) पोलीस हवालदार, आळंदी पोलीस स्टेशन यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दीपक मधुकर जाधव (वय 25, लॉज मॅनेजर, रा. समर्थ नगर गणेश मंदिरासमोर, दिघी, ता. हवेली, मूळ रा- इच्छापुर, ता. शहापूर, जि. बऱ्हाणपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी फाटा, कुरुळी येथील शिवसाई लॉजवर वेश्याव्यवसाय केला जातो अशी खबर आळंदी पोलीस ठाण्याला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री अकराच्या सुमारास छापा टाकून महिलांना व बँक मॅनेजरला वेश्या व्यवसाय करण्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरके हे तपास करत आहेत.

