मरकळ येथील हातभट्टीवर पोलिसांचा छापा!

पिंपरी : गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेले सुमारे दोन लाख सहा हजार रुपयांचे कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई रविवार दिनांक एक मार्च रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ गावच्या हद्दीत करण्यात आली.

पोलिस अंमलदार हरिराम डुमनर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरज कुमार रा.मरकळ, ता. खेड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुरज कुमार याने मरकळ गावच्या हद्दीत पाटील वस्ती येथे दारू तयार करण्यासाठी गुळमिश्रित रसायन भिजत घातले होते. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. आरोपीला याची चाहूल लागल्याने तो झाडाझुडपाच्या आसऱ्याने पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन लाख सहा हजार रुपये किमतीचे रसायन जप्त करून नष्ट केले .मरकळ येथील हातभट्टीवर पोलिसांचा छापा

