पत्त्याचा जुगारावर पोलीसांचा छापा ;नऊ हजार दोनशे रुपये जप्त!

पिंपरी: तीन पानी पत्त्याचा जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकून नऊ हजार दोनशे रुपये जप्त केले. ही कारवाई रविवार 29 मार्च रोजी पावणे चार वाजण्याच्या सुमारास अण्णासाहेब मगर नगर, नवीन पत्राशेड, डी मार्टच्या पाठीमागे मोकळ्या जागेत, चिंचवड येथे करण्यात आली.

याप्रकरणी दत्तू नंदू पाटेकर पोलीस शिपाई, संत तुकाराम नगर पोलीस ठाणे यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तुकाराम यल्लाप्पा कुसाळकर (वय 55, अण्णासाहेब मगर नगर झोपडपट्टी, डी मार्ट शेजारी), नीलू नामदेव जाधव (वय 45, शांतीनगर गल्ली क्रमांक एक, काळेवाडी), रवी रामू चव्हाण (वय 36, रा. पंचशील हॉटेल मागे, टेल्को रोड, इंदिरानगर), देविदास धोंडीबा शिंगाडे (वय 50, रा.बी 52 पंचशील हॉटेल मागे, टेल्को रोड इंदिरानगर), मनोज काळूराम गुंजाळ (वय 36, रा. पंचशील हॉटेलच्या पाठीमागे, घर नंबर 37, इंदिरानगर), विशाल लक्ष्मण काकडे (वय 26 ,रा. मोरजाई मंदिराजवळ, लाल टोपी नगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र जमून तीन पत्त्याचा पैशावर जुगार खेळत असताना कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून नऊ हजार दोनशे रुपये ताब्यात घेण्यात आले .संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार मुजावर हे तपास करत आहेत.

