फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
गुन्हेगारी

फौजदाराला शिवीगाळ करत मारहाण!

फौजदाराला शिवीगाळ करत मारहाण!

पिंपरी : एकाचा जामीन अर्ज रद्द करावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका नागरिकाने फौजदाराला शिवीगाळ करत मारहाण केली.ही घटना बुधवार दोन मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता हिंजवडी पोलीस ठाण्यात घडली .

मधुकर रविकांत जगताप{वय 47 राहणार सांगवडे ता. मावळ }असेगुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मधुकर जगताप हा तुषार नथू जगताप{सांगवडे } व्यक्तीचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याबाबतचा अर्ज घेऊन आले होते.त्यावेळी फिर्यादी ज्ञानेश्वर झोल हे ठाणे आमदार म्हणून कर्तव्य पार पाडीत होते.यावेळी आरोपी मधुकर जगताप यांचा अर्ज त्यांनी घेतला.त्यावेळेस आरोपी मधुकर जगताप याने याने तुषार जगताप हा व्हाट्सअप वर अक्षेपार्य मेसेज टाकत आहे,तुम्ही त्याला आत्ताच्या आत्ता फोन लावा असे सांगितले.

ही घटना परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तुम्ही त्या पोलीस ठाण्यात वेगळा अर्ज देऊन किंवा तक्रार नोंदवा असे उपनिरीक्षक झोल यांनी सांगितले.त्यामुळे संतप्त झालेले मधुकर जगताप यांनी फिर्यादी झोलयांना शिवीगाळ केली.अंगाशी झटापट करून त्यांच्या खिशाचे बटन तोडले.पोलीस ठाण्यातील अन्य पोलीस कर्मचारी यावेळी जगताप यांना समजावण्यासाठी आले असता त्यांनाही जुमानले नाही.तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुझी वर्दी उतरवतो,अशी धमकी दिली.तसेच तू बाहेर ये तुला दाखवतो अशी धमकी दिली.आरोपी मधुकर जगताप यांनी फिर्यादी ज्ञानेश्वर झोल हे करीत असलेले सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"