फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
गुन्हेगारी

पाच लाख रुपये किमतीचे हातभट्टी दारूचे रसायन पोलिसांनी केले नष्ट!

पाच लाख रुपये किमतीचे हातभट्टी दारूचे रसायन पोलिसांनी केले नष्ट!

 पिंपरी: शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरगाव आणि दारूंबरे या ठिकाणी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे गुळमिश्रित रसायन शिरगाव पोलिसांनी नष्ट केले.

 शिरगाव येथील हदिदत सुरेश गायकवाड यांचे शेताच्या बाजूला, पवना नदीच्या कडेला मोकळ्या जागेत 10 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.  रामेश्वर बाबुराव जाधवर पोलीस कॉन्स्टेबल, शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन यांनी याप्रकरणी एका महिले विरुध्द फिर्याद दिली आहे.

viara vcc
viara vcc

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे दहा हजार लिटर गूळ मिश्रित कच्चे रसायन दारू असा एकूण तीन लाख 50 हजार रुपये किमतीचा प्रोव्हिजनचा माल बेकायदेशीररित्या भिजत घातलेला मिळून आला. पोलिसांनी छापा टाकल्याचे कळताच महिला आरोपी तेथून फरार झाली.

 दारूंबरे गावचे हद्दीत हातभट्टी दारू तयार करण्यासाठी एक लाख 45 हजार रुपये किमतीचे 2900 लिटर गूळ मिश्रित रसायन भिजत घातलेले पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी छापा टाकल्याचे कळताच येथील महिला देखील पळून गेली. हा रसायन मिश्रित माल पोलिसांनी नष्ट केला. याप्रकरणी बाबाराजे रामराव मुंडे पोलीस शिपाई , गुन्हे शाखा युनिट 4 यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात एका महिला आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"