फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

 जुगार खेळताना पोलिसांनी पाच जणांना घेतले ताब्यात!

 जुगार खेळताना पोलिसांनी पाच जणांना घेतले ताब्यात!

पिंपरी : अजंठा नगर येथे मोकळ्या जागेत जुगार खेळताना पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले .ही घटना शनिवार 27 डिसेंबर रोजी पावणे पाचच्या सुमारास समता बिल्डिंगच्या मागे, अजिंठानगर, पुणे येथे घडली. या प्रकरणी दीपक गुणवंत पिसे पोलीस शिपाई यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

योगेश बाळू सोनवणे (वय 26, समता हाउसिंग सोसायटी, बिल्डिंग ए सहा, रूम नंबर 313, अजंठा नगर), नामदेव दिगंबर समिंदर (वय 53, सोसायटी बिल्डींग सात, रूम नंबर 707, निगडी), भास्कर गणपत साबळे (वय 65, रूम नंबर 501, अजंठा नगर), सिद्धार्थ विठ्ठल सुकाळे (वय 65, राहणार फुले आंबेडकर बिल्डिंग नंबर 3, रु. नंबर 314 निगडी) रामदास पुंडलिक गायकवाड (वय 68, रा. कृष्णानगर संविधान चौकाजवळ, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी समता नगर बिल्डिंगच्या मागे अजंठा नगर येथील मोकळ्या जागेत पत्त्याचा जुगार खेळत होते. महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलमानुसार कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सोळाशे रुपये रोख व पत्त्याचा कॅट जप्त करण्यात आला .याबाबत निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सिसोदे हे पुढील तपास करत आहेत .

viara vcc
viara vcc

कंटेनरची दुचाकीस्वाराला धडक ; एकाचा मृत्यू!
पिंपरी : लेलँड कंपनीच्या कंटेनरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 26 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथील इंडियन पेट्रोल पंपाजवळ ,तळेगाव -चाकण रोड येथे घडली.

याप्रकरणी गणेश तुळशीराम शिंदे वय 35, रा. विलास कातोरे यांच्या भाड्याच्या रूम मध्ये, बर्गे वस्ती, चिंबळी गाव यांनी उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर क्रमांक एम. एच/ 46 ए .एफ /95 67 वरील चालकाने भरधाव कंटेनर चालवून दुचाकीस्वारला जोरदार धडक दिली. त्यामुळे फिर्यादीचा चुलत भाऊ अजय हरिदास शिंदे गंभीर जखमी झाला . अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"