फक्त मुद्द्याचं!

2nd March 2026
गुन्हेगारी

पर्स मधून चोरी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी केली अटक!

पर्स मधून चोरी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी केली अटक!

पिंपरी : बँक परिसरात महिलांच्या पर्स मधून चोरी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी दुपारी बँक ऑफ महाराष्ट्र लांडेवाडी येथे घडला. संबंधित महिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी मूळ मध्यप्रदेश मधील हसाना रघुवीर सिसोदिया (वय 32, रा. गलखेडी, ता. पचोर, जि. राजगड, मध्य प्रदेश) आणि ललिता मलखान सिसोदिया (वय 30, रा. कडिया, ता. पचोर, जि. राजगड, मध्य प्रदेश) या दोन महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित फिर्यादी महाराष्ट्र बँकेच्या लांडेवाडी शाखेत आल्या होत्या. त्यांनी आपल्या खात्यातून 60 हजार रुपये काढून पर्समध्ये ठेवले. त्यातील दहा हजार रुपये वरील दोघींनी चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला. भोसरीचे पोलीस उपनिरीक्षक पारधी तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

मैत्रिणीनेच सोन्याचे दागिने केले लंपास!
पिंपरी : घरात नेहमी येणार्या मैत्रिणीने कपाटातील ४६.२९ ग्रॅम वजनाचे सुमारे दोन लाख 41 हजार 450 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना चिंचवड येथे दिनांक १७ डिसेंबर २०२५ ते २४ फेब्रुवारी 2026 या कालावधीत घडली.

या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याबाबत एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या मुलीची मैत्रीण ही नेहमी घरी येत असल्याने तिला घरातील दागिने कोठे ठेवतात हे माहीत होते. त्या मैत्रिणीने 17 डिसेंबर 2025 ते 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सर्वांच्या नकळत घरातील ४६.२९ ग्रॅम वजनाचे दोन लाख 41 हजार 450 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत. मैत्रिणीनेच सोन्याचे दागिने केले लंपास

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"