बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी थेरगाव येथे पोलीसांची कारवाई!

दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने थेरगाव येथे कारवाई केली. त्यामध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी संदीपनगर येथे करण्यात आली.
रोहित नामदेव गोंदील (वय २३, रा. थेरगाव), दिगूशेठ (थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार गोविंद डोके यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नगर थेरगाव येथे एक व्यक्ती बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी रोहित गोंदील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७५० रुपये किमतीची ५५ लिटर दारू जप्त करण्यात आली. दारू विक्रीचे साहित्य दिगूशेठ नावाच्या व्यक्तीचे असून तो दारू विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे रोहित याने सांगितले. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.