फक्त मुद्द्याचं!

23rd February 2026
गुन्हेगारी

देहूरोड येथे मटका अड्ड्यावर पोलिसांची कारवाई!

देहूरोड येथे मटका अड्ड्यावर पोलिसांची कारवाई!

पिंपरी : देहूरोड येथील श्रीकृष्ण नगर भागात मटका जुगार खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या चार जनाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास केली.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी रमेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. दीपक रोहिदास अवचारी (वय 41 रा. विकासनगर देहूरोड), दत्तात्रेय औदुंबर शिंदे (वय 36, रा.देहूरोड), प्रवीण सुभाष कान्हेरे वय 34, रा .मामुर्डी आणि अमीन इस्माईल शेख (वय 30, रा. देहू रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. श्रीकृष्णनगर मधील सार्वजनिक ठिकाणी कागदी चिठ्ठ्यांवर कल्याण मुंबई नावाच्या मटका जुगाराचे आकडे घेऊन पैसे लावून जुगार खेळत होते. पोलिसांनी 2620 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

viara vcc
viara vcc

 रिक्षा चालकाला रॉडने मारहाण ; आरोपीला अटक
पिंपरी : अपघाताच्या कारणावरून झालेल्या वादात मोटार चालकाने रिक्षा चालकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. हा प्रकार शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वाकड भूमकर चौकाजवळ घडला. आरोपीला अटक केली आहे.

विशाल पंढरीनाथ जाधव (वय 43, रा. हिंजवडी ता. मुळशी) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मोटार चालक संभाजी किसन सकपाळ (वय 45 ,रा. वाकड) या आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची रिक्षा आणि मोटारीचा अपघात झाला. त्यानंतर मोटार चालक आरोपी तुझे काय नुकसान झाले आहे असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ व धमकी दिली. रागाच्या भरात आरोपीने जवळ असलेल्या लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर जोरात मारून त्यांना गंभीर दुखापत केली. हिंजवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी चौधरी पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"