फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

बनावट कागदपत्राद्वारे पीएनबी हाउसिंग फायनान्सचे कर्ज!

बनावट कागदपत्राद्वारे पीएनबी हाउसिंग फायनान्सचे कर्ज!

चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी : बनावट खरेदी खत करून पिंपरी खराळवाडी येथील म्यारोथामा चर्चच्या मालकीच्या तीन गुंठे जागेवर पीएनबी हाउसिंग फायनान्सचे कर्ज घेतल्याप्रकरणी चार जणाविरुद्ध संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चर्चचे ट्रस्टी सुबीन तनी कोशी (वय 42 )यांनी फिर्याद दिली आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅरेथोमा चर्चची cts क्रमांक 53 58 व 53 58 /1 सर्व्हे क्रमांक 167/1 अ दोन पिंपरी खराळवाडी येथे तीन गुंठे जागा आहे. या मिळकतीवरील बांधकाम पूर्णत्वाचा बनावट दाखला तयार करून त्याचा वापर दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 11 येथे बनावट कागदपत्रे सादर केली. मिळकतीचा एग्रीमेंट टू सेल दस्त क्रमांक 71 53/ 2017 नोंदवून घेतला. ही मिळकत पीएनबी हाउसिंग फायनान्स येथे तारण ठेवून लोन घेतले. या लोणचे हप्ते न भरल्याने पीएन बी हाऊसिंग फायनान्स कंपनीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय पुणे येथे मिळकतीचा ताबा कारवाईचा आदेश प्राप्त करून घेतला.

25 ऑक्टोबर 2025 रोजी मिळकतीच्या गेटवर नोटीस चिटकवण्यात आली आणि कारवाई करणार असल्याचे निदर्शनास आले .याबाबत ट्रस्टींना कोणतीच कल्पना नसल्याने त्यांनी संतोष चंद्रकांत राऊत, राहुल सुनीलदत्त शर्मा ,कमलादेवी शर्मा (दोघेही राहणार 303 तिसरा मजला ,शुभ आपारमेंट, सी एच एस कॅम्प ,कोला कंपाऊंड ,बीजी खेर रोड ,वरळी नाका मुंबई), सतीश नानवते (रा. भोसरी )या आरोपींविरुद्ध संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .ही घटना चार ऑगस्ट 2017 ते पाच डिसेंबर 2025 या कालावधीत घडली आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत तुकाराम नगर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"