फक्त मुद्द्याचं!

28th June 2025
पुणे

पीएमआरडीएतर्फे वारकऱ्यांचे स्वागत अन् सोयी सुविधा!

पीएमआरडीएतर्फे वारकऱ्यांचे स्वागत अन् सोयी सुविधा!

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे भाविकांचे स्वागत आणि त्यांना सोयी – सुविधा पुरविण्यात आल्या. पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या भाविकांसाठी पीएमआरडीएतर्फे दोन ठिकाणी स्वागत केंद्र उभारून छायेसाठी निवारा शेड, शुद्ध पिण्याचे पाणी, मास्क व बिस्कीट वाटप, अग्निशमन पथक सेवेवर कार्यरत होते.

viarasmall
viarasmall

संत तुकाराम महाराज पालखीचे कदम वाकवस्ती लोणी काळभोर तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वडकी नाला, हडपसर – सासवड- जेजुरी रस्त्यावर पीएमआरडीएतर्फे वारकऱ्यांसाठी स्वागत केंद्र उभारून प्रत्येक वारीचे शाल – श्रीफळ देऊन त्यांना विविध सुविधा पुरविण्यात आल्या. यावेळी अधीक्षक अभियंता प्रभाकर वसईकर, अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी, उप-अभियंता सुभाष मोरे, अरविंद माळी, जितेंद्र पगार, जयेश भदाणे यांच्यासह पीएमआरडीएचे कर्मचारी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"