फक्त मुद्द्याचं!

10th March 2026
पुणे

पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा प्रश्न मार्गी!

पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा प्रश्न मार्गी!

पिंपरी-चिंचवड महापालिका हिस्स्याची थकीत रक्कम अदा
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (‘पीएमपीएमएल’) कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार थकीत असलेला फरक लवकरच मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४०% हिस्स्यानुसार 56.10 कोटी रुपये त्वरित महामंडळाला दिली जाणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महापालिका हिस्स्याची थकीत रक्कम ‘पीएमपीएमएल’कडे वितरीत करण्यात येणार आहे.

viara vcc
viara vcc

सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना फरक देण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली होती. यापूर्वी पहिल्या हप्त्याचे वितरण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पुढाकारातून पूर्ण झाले होते, मात्र दुसऱ्या हप्त्याबाबत विलंब झाला होता. याबाबत भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे पीएमपीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. तसेच, ‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या वतीने रवींद्र लांडगे, संतोष काळजे, दिनकर काळजे आणि उमेश धावडे यांनी सातत्त्याने पाठपुरावा केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्यासह चर्चा करून आमदार लांडगे यांनी पहिल्या फरकाच्या हप्त्याचे वितरण सुनिश्चित केले होते. त्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना सातत्याने सूचना देऊन रक्कम लवकर काढण्याचे प्रयत्न केले. संबंधित बैठकीत पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, कामगार संघटना पदाधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता. या चर्चेत निर्णय घेण्यात आला की, महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा फरक चार हप्त्यांमध्ये वितरीत केला जाईल.

आमदार लांडगे म्हणाले की, “दुसऱ्या हप्त्याबरोबरच उर्वरित दोन हप्तेसुद्धा लवकर वितरीत केले जातील. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम योग्य वेळी मिळावी. हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महामंडळाकडून 2025-26 च्या अंदाजपत्रकात आर्थिक तूट लक्षात घेऊन पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका स्वतःच्या उत्पन्नातून फरक भरून देणार आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"