फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार गुंडास अटक!

पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार गुंडास अटक!

पिंपरी: दोन वर्षासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून तडीपार केलेल्या एका गुंडाने आदेशाचा भंग करत शहरात प्रवेश केला. त्याच्याकडे बेकायदा पिस्तूल आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर रोजी पहाटे एकच्या सुमारास जगताप नगर, थेरगाव येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी पोलीस शिपाई भारत पारधी यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शंतनू उर्फ आदित्य दिनेश गायकवाड (वय 21, रा. किनारा कॉलनी ,रहाटणी) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. हा आदेश जुगारून तो शहरात आला आणि त्याच्याकडे 27 हजार रुपये किमतीचे एक विनापरवाना पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस सापडले. तसेच शस्त्र बाळगण्यास मनाई असलेल्या आदेशाचेही त्याने उल्लंघन केले आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"