पिंपरी चिंचवड पोलिसांनी पंधरा दिवसात 50 पिस्तुले 79 काडतुसे केली जप्त!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांनी 13 ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीत सर्व पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट यांनी केलेल्या कारवाईत 50 पिस्तुले 79 जिवंत काडतुसे 91 कोयते आणि बारा तलवारी जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यात मधील आणि गुन्हे शाखा युनिट यांनी विविध ठिकाणी कारवाई करून घातक शस्त्र आणि धारदार हत्यारे बाळगणाऱ्या विरोधात कारवाई केली. ही विशेष मोहीम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .
याप्रकरणी पोलिसांनी अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या चाळीस जणांवर गुन्हे दाखल करून 45 जणांना अटक केली आहे .त्यांच्याकडून 49 पिस्तुले आणि 79 जिवंत काढतुशे तसेच धारदार शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात कारवाई करत 94 गुन्हे दाखल केले आणि 66 आरोपींना अटक करण्यात आली .त्यांच्याकडून 91 कोयते बारा तलवारी असे एकूण 116 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली.