फक्त मुद्द्याचं!

15th April 2025
शिक्षण

फॉर्मुला भारत स्पर्धेत पीसीसीओईचा चौथ्यांदा विजय

फॉर्मुला भारत स्पर्धेत पीसीसीओईचा चौथ्यांदा विजय

प्रथम क्रमांकाच्या सात पारितोषिकांसह एकूण दहा पारितोषिके पटकावली

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : फॉर्मुला भारत ही भारतातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक वाहन स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये संघटन, नियोजन, अभियांत्रिकी कौशल्य आणि सातत्यपूर्ण अचूक प्रदर्शन करीत पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. नवसंशोधन, उत्कृष्ट तांत्रिक क्षमता आणि अपार जिद्द, नियोजन यामुळे पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) टीम क्रेटॉसने सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे. यासाठी त्यांना प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि पीसीईटीच्या विश्वस्तांचे पाठबळ मिळाले आहे यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन करताना विश्वस्त मंडळाला अभिमान वाटतो असे गौरवोउद्गार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी काढले.

कोईमतूर येथे झालेल्या फॉर्मुला भारत २०२५ या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या, आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) प्रथम क्रमांकाची एकूण सात पारितोषिके, तसेच व्यावसायिक सादरीकरण वर्गामध्ये तृतीय क्रमांक आणि सर्वोत्कृष्ट चालक पुरस्कार व सर्वात स्वच्छ कार्यशाळा पुरस्कार अशी एकूण दहा पारितोषिक पटकवली.

टीम क्रेटॉसच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक प्राध्यापकांचा गौरव समारंभ पीसीईटीच्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी पीसीईटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, अधिष्ठाता डॉ. पद्माकर देशमुख, टीम मार्गदर्शक डॉ. सागर वानखेडे व यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते.

टीम क्रेटॉसने गतिशील विभाग, सहनशक्ती, कार्यक्षमता, स्किडपॅड, प्रवेग, स्वयंचलन, खर्च व उत्पादन या वर्गामध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तर व्यावसायिक सादरीकरण वर्गामध्ये तृतीय क्रमांक, तसेच सर्वोत्कृष्ट चालक पुरस्कार आणि सर्वात स्वच्छ कार्यशाळा पुरस्कार असे एकूण दहा पारितोषिके पटकावली. टीम क्रेटॉस मध्ये मेकॅनिकल विभागासह इ.अँड टी. सी. विभागाच्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या समावेश होता. कर्णधार म्हणून इन्वेश सोनार याने काम पाहिले.

टीम क्रेटॉस मध्ये ध्रुव भट, जी. आर. हरीकृष्णन, मनीश मैथी, यशवंत कांबळे, ऋतुराज पाटील, आदिनाथ केळकर, ऋषिकेश बारपांडे, ओम लोणकर, निर्भिक नवीन, राधा कराळे, रोहन पाटील, रोहित सावंत, उपेंद्र पाटील, सत्यजित माने देशमुख, पार्थ दलाल, ध्रुव दामले, आभा शिरोळे, नारायणी फरकाडे, ओंमकार बिरादार, हर्षवर्धन पाटील, सुरज आहेर, राम गोखले, आर्यन गव्हाणकर, ओमकार पडवळकर, सोहम माळी, देवदत्त लांबे, महेश सोनुरे, सर्वेश धामणे, हर्षद चौधरी, केदार काजवे, आर्चीत साओकार, केतकी गायकवाड, श्रावणी कुलथे, अनिकेत ननावरे, अभिषेक मुळे, ध्रुव हक्के, रुद्रा उमाटे, पार्थ थापेकर, क्षितिज राणे, वेदांत गरुडे, मुगदा पडवळ आणि वेदांत पवार आदींचा समावेश होता.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"