ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू!

पिंपरी : पादचारी रस्ता क्रॉस करीत असताना एका ट्रकने पाठीमागून पादचाऱ्याला जोरदार धडक दिली या धडकेत पादचारी गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. ही घटना मंगळवार 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजताचे सुमारास ए.आर. ए.आय चौक, निघोजे, ता. खेड येथे घडली. मोहम्मद नौशाद इर्शाद (वय 30) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे

याप्रकरणी धरजकुमार काशिनाथ राम (वय 27, रा. गणेश यांच्या भाड्याच्या खोलीमध्ये, सारा सिटी, ता. खेड) यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ट्रक क्रमांक (एम.एच 12, एचडी /73 72) वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहम्मद नौशाद इर्शाद (वय 30) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा रूम पार्टनर मोहम्मद नौशाद इर्शाद (वय 30) हा पायी रस्ता क्रॉस करीत असताना ट्रक क्रमांक (एम.एच 12, एचडी /73 72) वरील अज्ञात चालकाने आपल्याच ताब्यातील ट्रक भरधाव चालवून पाठीमागून पादचाऱ्याला धडक दिली. या धडकेत फिर्यादीच्या पार्टनरच्या पायावरून गाडी गेल्याने त्याच गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा मृत्यू झाला. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घुले हे पुढील तपास करत आहेत.

