फक्त मुद्द्याचं!

16th February 2026
महाराष्ट्र

पवना, मुळशी, खडकवासला धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढविला!

पवना, मुळशी, खडकवासला धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढविला!

मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे
पिंपरी : पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की सद्यस्थितीमध्ये पवना धरण 100% भरलेले आहे व धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात 1400 क्युसेक विसर्ग होता..  पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊसास सुरुवात झाली असून आज सकाळी 10:30 वाजता नदीपात्रात होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून एकूण विसर्ग3650 क्युसेक करण्यात आला आहे.

navratra 7
navratra 7

पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो . सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे. पवना धरण पूरनियंत्रण कक्ष, खडकवासला पाटबंधारे विभाग,

मुळशी धरण ९९.१६ % भरले आहे व पाऊस कमी ,अधिक प्रमाणात होत आहे आणि पाणी पातळीत वाढ,घट होत आहे. मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत सकाळी 12:०० वाजता 7000 Cusecs सुरू करण्यात आला. तसेच पाऊस चालू,, वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी, जास्त करण्यात येईल. नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. सुरेश कोंडूभैरी टाटा पॅावर मुळशी धरण

नंदुरबार, धुळे ,नाशिक ,जळगाव ,अहिल्यानगर,पुणे ,सातारा, सांगली, कोल्हापूर ,सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, पालघर, ठाणे ,मुंबई, रायगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे

धरणातून नदी पात्रात सोडण्यात आलेला एकूण विसर्ग खालील प्रमाणे
1. पिंपळगांव जोगे – 2280 क्युसेक ,2. माणिकडोह – 0 क्युसेक , 3. येडगाव – 2200 क्युसेक, 4. वडज –7500 क्युसेक ,5. डिंभे – 14650 क्युसेक ,6. घोड – 5000 क्युसेक ,7. विसापूर – 550 क्युसेक ,8. चिल्हेवाडी – 600 क्युसेक,9. कळमोडी – 89 क्युसेक ,10. चासकमान –3300 क्युसेक ,11. भामा आसखेड – 13312 क्युसेक ,12. वडीवळे – 688 क्युसेक,13. आंद्रा – 288 क्युसेक,14. पवना –3650 क्युसेक ,15. कासारसाई –150 क्युसेक, 16. मुळशी –7000 क्युसेक ,17. टेमघर – 0 क्युसेक ,18. वरसगाव – 1766 क्युसेक ,19. पानशेत – 1720 क्युसेक ,20. खडकवासला – 6864 क्युसेक ,21. गुंजवणी – 250 क्युसेक ,22. नीरा देवधर – 750 क्युसेक ,23. भाटघर –1614 क्युसेक ,24. वीर – 7487 क्युसेक ,25. नाझरे – 324 क्युसेक ,26. उजनी –51600 क्युसेक ,बंडगार्डन – 9720 क्युसेक@8:00PM ,दौंड- 9096 क्युसेक@6:00PM ,नीरा नरसिंगपूर- 109253 क्युसेक@8:00PM ,पंढरपूर भीमा नदी– 52272 क्युसेक@8:00PM

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"