पशुपतिनाथ, नेपाळ पर्यटनाच्या बहाण्याने फसवणूक!

पिंपरी :आमची टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे असे सांगून पशुपतिनाथ, नेपाळ येथे जाण्यासाठी एका व्यक्तीने मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून माहिती दिली. फिर्यादीने ऑनलाइन ७३५०० एवढी रक्कम ट्रान्सफर केली मात्र कोणतीही सर्विस न देता फसवणूक केली. ही घटना बुधवार 18 फेब्रुवारी रोजी राहते घरी सी 801 ,कूल होम्स, बावधन येथे घडली.

एका व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महेश पालक असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने आपली टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी असून पशुपतिनाथ, नेपाळ येथे जाण्यासाठी मोबाईल क्रमांकावरून संपर्क केला. आरोपी यांनी फिर्यादी यांना सविस्तर माहिती दिली. फिर्यादी यांची खात्री झाल्याने फिर्यादी यांनी 73 हजार पाचशे रुपये एवढी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली. नंतर कोणत्याही प्रकारची सर्विस न देता 73 हजार पाचशे रुपये एवढ्या रकमेची फसवणूक केली. बावधन पोलीस पुढील तपास करत आहेत.

