फक्त मुद्द्याचं!

19th March 2026
शिक्षण

पालकांनी पाल्यांना महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवावा ;आयुक्त

पालकांनी पाल्यांना महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवावा ;आयुक्त

महापालिकेच्या वतीने ‘गुढीपाडवा पट वाढवा’ अभियानाचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते शुभारंभ
पिंपरी : ‘गुढीपाडवा – पट वाढवा’ हे अभियान केवळ प्रवेश वाढविण्यापुरता मर्यादित नसून, प्रत्येक मुलापर्यंत दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण पोहोचविण्याचा एक व्यापक प्रयत्न आहे. महापालिका शाळांमधील आधुनिक सुविधा, समर्पित शिक्षकवर्ग आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यांच्या बळावर शिक्षणाची भक्कम पायाभरणी होत आहे,त्यामुळे अधिकाधिक पालकांनी या गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांचा महापालिका शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, तसेच या शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

vcc gudhi padva
vcc gudhi padva

राज्य शासनाच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली येथील म्हेत्रेवाडी शाळा क्र. ९३ येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने “गुढीपाडवा पट वाढवा” या विशेष प्रवेश अभियानाचा शुभारंभ आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नव्याने शाळेत प्रवेश घेऊन आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

याप्रसंगी शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, नगरसदस्य यश साने, नगरसदस्या रिटा सानप, प्रियंका कुदळे, माजी नगरसदस्य सचिन सानप, शिक्षण विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापिका स्नेहल मोरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शाळेतील शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीतील नवचैतन्य, नव्या सुरुवातीचा सण आहे. याच शुभमुहूर्तावर ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या उपक्रमाचा शुभारंभ करताना मला विशेष आनंद होत आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे.. छोट्याशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आपुलकी निर्माण झाली आणि पालकांचा विश्वासही वाढला. आज हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात राबविला जात असल्याचा मला आनंद आहे.अनेकदा महापालिका शाळांबाबत पालकांध्ये गैरसमज आढळून येतात. मात्र, प्रत्यक्षात या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात. या सकारात्मक बाबींची माहिती पालकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे ही महापालिका शाळांची विशेषता आहे.

.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी अत्यंत कुशल, समर्पित आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत. विशेषतः म्हेत्रेवाडी येथील शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून, त्यांचे योगदान शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम बनवते. , महापालिका शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि पटसंख्या वाढविण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून ‘गुढीपाडवा पट वाढवा’ हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल असेही आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

शिक्षण समितीच्या सभापती रविना अंगोळकर म्हणाल्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत महापौर रवि लांडगे आणि नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सहकार्याने निश्चितच सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास आहे. आज महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या तोडीस तोड अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक साधनसामग्री आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे पालकांचा महापालिका शाळांवरील विश्वास अधिक दृढ होत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मास्टर ट्रेनर आनंदी जंगम यांनी, सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मान

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"