फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
कला साहित्य

चित्रकला हे अव्यक्त संवादाचे माध्यम : विजय सारडा

चित्रकला हे अव्यक्त संवादाचे माध्यम : विजय सारडा

लायन्स क्लब इंटरनॅशनल पीस पोस्टर २०२५ – २६ चा पारितोषिक सोहळा संपन्न
पिंपरी : ‘चित्रकला हे अव्यक्त संवादाचे माध्यम आहे; पण विश्वशांतीचा प्रभावी संदेश त्यातून जगाला देता येतो!’ असे विचार लायन्स क्लब इंटरनॅशनल मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन एम जे एफ विजय सारडा यांनी ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृहात व्यक्त केले.  लायन्स क्लब इंटरनॅशनल पीस पोस्टर २०२५ – २६ या आंतरराष्ट्रीय विश्वशांती चित्रकला स्पर्धांच्या पारितोषिक वितरण व प्रदर्शन सोहळ्यात विजय सारडा बोलत होते.

viara vcc
viara vcc

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी – २ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेश आगरवाल, डिस्ट्रिक्ट ३२३४ डी – २ चे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन पीस पोस्टर एम जे एफ सलीम शिकलगार, एम जे एफ फर्स्ट व्हाॅईस प्रेसिडेंट श्रेयस दीक्षित, एम जे एफ सेकंड व्हाॅईस प्रेसिडेंट राजेंद्र गोयल, लायन्स क्लब ऑफ आकुर्डी चेअरपर्सन रश्मी नायर, रवी सातपुते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संयोजक सलीम शिकलगार यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, ‘जागतिक शांतता, बंधुभाव, मानवता यासाठी सुमारे शंभर वर्षांहून अधिक काळ सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली लायन्स क्लब इंटरनॅशनल ही सेवाभावी संस्था प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून शांतीचा संदेश देत असते. यावर्षी जगातील २०९ देशांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

‘टुगेदर ॲज वन’ अर्थातच ‘विश्वशांतीसाठी एकजूट करू या…’ हा यावर्षीच्या चित्रकला स्पर्धेचा विषय होता. अकरा ते चौदा हा विद्यार्थ्यांचा वयोगट खूप संस्कारक्षम असतो. त्यामुळेच हा वयोगट लक्षात घेऊन पिंपरी – चिंचवड परिसरातील एकूण ११० शाळा आणि महाराष्ट्रातील अन्य काही शाळांमधील सुमारे एकवीस हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत ही स्पर्धा राबविण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांनी या विषयावरील सुमारे तीस हजार भित्तिपत्रके स्पर्धेनिमित्त आमच्याकडे सुपुर्द केली होती. जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त झाले नसले तरी यानिमित्त आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात शांततेचा संदेश भिनला; तसेच त्यांचे कलागुण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले याचाच आनंद खूप मोठा आहे!’

सर्वाधिक सहभागाबद्दल लायन्स क्लब ऑफ पूना निगडी या क्लबला वीस हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. के बी एच विद्यालय, मालेगाव आणि लायन्स क्लब ऑफ मनमाड यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पाच आणि तीन हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. वैयक्तिक सात हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शांभवी देसाई (माॅडर्न हायस्कूल, निगडी) या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आले; तर माही चावलानी, सिद्धी कणसे, वैभवी शिंदे, साक्षी जाधव, भाग्यश्री माने आणि साहिल मौर्य या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.  विद्यार्थ्यांच्या निवडक उत्कृष्ट भित्तिपत्रकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते

लायन्स क्लब ऑफ निगडीच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात सहकार्य केले. शिल्पी कुमार यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर पवार यांनी आभार मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"