फक्त मुद्द्याचं!

23rd February 2026
गुन्हेगारी

अफूच्या झाडांची जांबे गावातील शेतात लागवड ;शेतकरी अटकेत!

अफूच्या झाडांची जांबे गावातील शेतात लागवड ;शेतकरी अटकेत!

पिंपरी :अमली पदार्थ अफूच्या झाडांची जांबे गावातील रसिकवाडी येथे शेतात लागवड करीत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. घटना शुक्रवार 20 फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जांबे गावातील रसिक वाडी ता. मुळशी येथे घडली.

याप्रकरणी विक्रम हंबीरराव जगदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुंडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .संपत बाबुराव दर्शिले (वय 77, रसीकवाडी, जांबे, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांबे गावात रसिकवाडी रोडच्या कडेला असलेल्या शालीमकर स्पोर्ट्स अरेना शेजारील शेतात आरोपी संपत बाबुराव दर्शिले यांच्या मालकीच्या शेतात 16 810 ग्रॅम वजनाची अफूची झाडे एकूण किंमत 25 लाख 17 हजार पाचशे लावत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी पुढील तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

पत्नीच्या पोटात चाकू भोकसून केले गंभीर जखमी; पतीस अटक!
पिंपरी : बाप लेकाची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या पोटात चाकू भोकसून गंभीर जखमी केले . ही घटना शनिवार 21 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास येळवंडे वस्ती, लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडली. आरोपीस अटक करण्यात आली आहे .

याबाबत एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .महेंद्र सोपान कांबळे (वय 35, रा. किरण येळवंडे यांची रूम, येळवंडे वस्ती, लक्ष्मी चौक, हिंजवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती महेंद्र कांबळे हे दारूच्या नशेत त्यांचा मुलगा प्रतीक यास शिवीगाळ करून मारहाण करत होते. ही भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी महिला गेल्या असता त्याचा राग येऊन फिर्यादी यांचे पती यांनी घरातील लाकडी टेबलावर ठेवलेला भाजी कापण्याचा चाकू हातात घेऊन फिर्यादीच्या पोटात भोसकून गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"