प्रतिबंधित वेबसाईटवर ऑनलाइन बेटिंग जुगार ; एकास अटक!

पिंपरी : वन विनकॉम (one win.com) या प्रतिबंधित केलेल्या ऑनलाइन वेबसाईटवर बेटिंग वेब पोर्टल द्वारे विनापरवाना ऑनलाइन जुगार खेळताना जुगाराचे 30000 रुपयाचे साहित्यसह मिळून आले. ही घटना बुधवार 11 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तुटे चौक ते सिद्धिविनायक, मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर मारुंजी येथे घडली .
याबाबत कारभारी नामदेव पालवे पोलीस शिपाई, हिंजवडी पोलीस ठाणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .सचिन प्रभूराम चौधरी (वय19 रा. गुरुकृपा रेसिडेन्सी, मारुंजी ग्रामपंचायत शेजारी, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वनविन कॉम ऑनलाइन वेबसाईटवर प्रतिबंधित केलेल्या बेटिंग वेब पोर्टल द्वारे विनापरवाना ऑनलाइन जुगार खेळताना ऑनलाईन जुगाराचे 30000 चे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले .ऑनलाइन जुगारसाठी वापरण्यात आलेले बनावट कागदपत्राद्वारे बँक खाते उघडण्यात आले. बनावट कागदात कागदपत्राद्वारे सिम कार्ड घेऊन बँक खातेदारांची ओळख वाढविली. आणि नागरिकांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ हे पुढील तपास करत आहेत.

दोन मित्रांमध्ये वाद; एकाचा खून
चाकण : भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये वाद झाल्याने एका मित्राने दुसऱ्यावर धारदार चाकूने छाती व जबड्यावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवार 11 फेब्रुवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास भाड्याच्या खोलीत नाणेकरवाडी, ता. खेड येथे घडली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत योगेश दत्तात्रय नाणेकर (वय 30, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कपिल जितेंद्र कोसलवार (ता. खेड, नाणेकरवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कपिल कोसलकर व मयत मित्र किशोर सुरेश राणे (वय 25) हे नानेकर वाडी येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्यात वाद झाल्याने आरोपी कोसलकर याने धारदार चाकूने आपला मित्र किशोर याच्या छातीवर जबड्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्यास स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोते हे तपास करत आहेत.

