पूर्ववैमनस्यातून एकास मारहाण; तिघांना अटक

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (५ सप्टेंबर) रात्री मोरवाडी कोर्टाजवळ घडली.

विजय बन्सीलाल कुर्मी (वय ३५, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल उर्फ बजरंग संदीप जानराव (वय २०, अजमेरा, पिंपरी), सार्थक शंकर कागदे (वय १९, नेहरुनगर, पिंपरी), जावेद सलीम शेख (वय १७, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) आणि आसीफ उर्फ सिराजुदिन आल्लवद्दीन खान (वय २०, मोरवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा गटटू आणि काठीने मारहाण केली. तसेच, त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी साहिल, सार्थक आणि आसिफ या तिघांना अटक केली आहे. संत तुकाराम नगर पोलिस तपास करत आहेत.