गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक!

पिंपरी : गुटखा आणि सुगंधी तंबाखू विक्रीवर राज्य शासनाने बंदी घातलेली असताना एका व्यक्तीने गुटखा विक्री केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे . ही कारवाई वडवोकवाडी परिसरात करण्यात आली असून मुन्ना उर्फ शोएब हजरत अख्तर शेख ( 25, वडमुख वाडी) याला अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक चंद्रकांत छबु जाधव ( वय 32) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडून एकूण 13381 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सुगंधी तंबाखू आणि पान मसाला असा जप्त केला आहे . शासनाच्या अधिसूचनेचे उल्लंघन करून आरोपी विक्री करीत असल्याचे उघड झाले आहे. दिघी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे .

