वाकड येथे गांजा विक्री; एकास अटक!

पिंपरी : पांढऱ्या रंगाच्या पॉलिथिन पिशवीतून गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .रविवार 12 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताचे सुमारास म्हातोबा नगर झोपडपट्टी, परफेक्ट ब्रेकर्स अँड स्वीट समोर ,डांगे चौक ते दत्त मंदिर रोड येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी सोमनाथ अनिल गुंजाळ (वय 18, रा म्हतोबा नगर झोपडपट्टी, दत्त मंदिर रोड वाकड) या व्यक्तीविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे
समाधान तुकाराम कांबळे (वय 29 ,पोलीस शिपाई ,वाकड पोलीस स्टेशन )यांनी फिर्यादी आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सोमनाथ गुंजाळ यांनी त्याच्या जवळील एकतीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा 631 ग्राम गांजा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करता जवळ बाळगला. तपासणी दरम्यान गांजा जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली .वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहे .

गांजा विक्री प्रकरणी एकास अटक ; गुन्हे शाखेची कारवाई!
देहूरोड : पुणे -बेंगलोर महामार्गाच्या चर्च जवळील बस स्टॉप जवळ गांजा विक्री करताना एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे . अनिल जगन्नाथ बोरसे (वय 41 ,रा आंबेडकर नगर, देहू रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी प्रशांत नारायण पवार (वय 48 ,पोलीस हवालदार, गुन्हे शाखा युनिट 4 )यांनी फिर्याद दाखल केली आहे .शनिवार 6 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजून 27 मिनिटाच्या सुमारास देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सेंट्रल चौकाकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बेंगलोर महामार्गावर चर्च जवळील बस स्टॉप समोर हा प्रकार घडला .आरोपीने 9 550 रुपये किमतीचा 931 ग्रॅम वजनाचा गांजा अमली पदार्थ बेकायदेशीरपणे ताब्यात बाळगला .आरोपीची तपासणी केली असता हा गांजा मिळून आला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट -4 पोलीस तपास करत आहेत.

