महिलेचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव;एकास अटक!

आळंदी : एका महिलेचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव रचून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे .ही घटना शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोळू (ता.खेड ) गावचे हद्दीत घडली.

याप्रकरणी कुमार कोंडीबा गिरीगोसावी पोलीस उपनिरीक्षक, आळंदी पोलीस ठाणे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विष्णू महादेव पावडे (वय 32, राजाभाऊ गावडे यांचे खोलीत भाड्याने, धानोरे, ता खेड, मूळ- हदगाव, ता. सेलू, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिला पार्वती दराडे (वय 30) व आरोपी विष्णू महादेव पावडे हे एकमेकांचे चांगले ओळखीचे होते. दोघे कामानिमित्त एकत्र बाहेर पडल्यानंतर मोटरसायकलवर सोळू ता. खेड डोंगरावरील जंगलामध्ये गेले होते. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. आरोपी विष्णू पावडे यांनी मयत हिचा कशाच्या तरी साह्याने गळा आवळून तिला जीवे ठार मारले .
आरोपी याने गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने व आत्महत्येचा बनाव निर्माण करण्यासाठी मयत महिला हिचा मृतदेह जंगलातील एका झाडाला जमिनीपासून चार फूट उंचीवर स्कार्प बांधून बसलेल्या स्थितीत ठेवला.मृतदेहाच्या गळ्याला स्कार्फचेदुसरे टोक बांधून आत्महत्येचा बनावट निर्माण केला. गुन्हा करून आरोपी पळून गेला. मात्र नंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे .आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दुधमल हे पुढील तपास करत आहेत.

