फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
शिक्षण

तारांगण येथे वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन

तारांगण येथे वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त पिंपरीचिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण यांच्या वतीने सात ऑक्टोबरपर्यंत वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सायन्स पार्कचे संचालक सारंग ओक यांनी काढलेल्या वन्यजीवांच्या छायाचित्रांचे संकलन येथे पाहता येईल.

पक्षी निरीक्षक उमेश वाघेला यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम शाळेतील विद्यार्थी, प्रेक्षक तसेच शिक्षकांसह १०० नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार कासार यांनी प्रास्ताविक केले. सुनील पोटे, सोनल थोरवे व तांत्रिक विभागातील सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. सायन्स पार्क व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान व्याख्यानाचे ११६ वे पुष्प, “आपल्या सभोवतालचे पक्षी” या विषयावर उमेश वाघेला यांचे माहितीपूर्ण व्याख्यान देखील झाले.

हे प्रदर्शन सात ऑक्टोबरपर्यंत सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहा या वेळात तारांगण तळमजला येथे खुले असेल. नागरिकांनी जरूर या संधीचा लाभ घ्यावा. या प्रदर्शनासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश राहील.

(अधिक माहितीसाठी संपर्क – ७७४४९४४३३३, कार्यालयीन वेळ – स. १०:०० ते सायं. ०६:००)

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"