फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
मनोरंजन

`नवरा माझा नवसाचा २` ने किती कोटी कमावले?

`नवरा माझा नवसाचा २` ने किती कोटी कमावले?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाने रूपेरी पडद्यावर धमाल केली आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी प्रचंड प्रतिसाद तर मिळालाच पण पहिल्या वीकेंडला सुद्धा या सिनेमाने दमदार कमाई केली आहे. एप्रिल २००५ मध्ये नवरा माझा नवसाचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि आता इतक्या वर्षांनी त्याची जादू कायम ठेवत सिक्वेलला सुद्धा तितकाच प्रतिसाद मिळाला आहे.

नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडले आहेत. बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्ये ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट चर्चेत राहिला आणि त्याचंच प्रतिबिंब बॉक्स ऑफिसवरही उमटत आहे.

‘नवरा माझा नवसाचा 2’ हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि पहिल्चया वीकेंडला या चित्रपटाने ७.८४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. यात अभिनेता सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे अशी मोठी स्टारकास्ट आहे.

अभिनेता स्वप्नील जोशी-हेमल इंगळे ही जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांचा जावई आणि मुलगी अशा भूमिकेत आहेत. सासऱ्यांनी ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला, तसा आता जावयाला फेडता येतो का? याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळते. नवस फेडण्यासाठीच्या रेल्वे प्रवासात हिरे चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाचं कथानकही उलगडणार आहे. त्यामुळे मनोरंजक आणि थरारक अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळत आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"