नवकार आर्टतर्फे बालगंधर्वमध्ये प्रदर्शन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : जैन समाजातील चित्रकार, शिल्पकार आणि अन्य कलेत प्रवीण असलेल्या महिलांना समाजात वेगळी ओळख मिळवून देण्यासाठी नवकार आर्ट फाउंडेशनने बालगंधर्व कलादालन येथे कलाप्रदर्शन आयोजित केले आहे. आजपासून (२२ नोव्हेंबर) हे प्रदर्शन सुरू झाले आहे.
फाउंडेशनने आतापर्यंत मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक अशा ११ शहरांमध्ये प्रदर्शन भरविले आहे. जैन महिला कलाकारांचे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी सात या वेळेत प्रदर्शनास भेट देता येईल.