जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाचा खून ; एकास अटक

चाकण : जुन्या भांडणाचा राग मनात धरून स्क्रू ड्रायव्हर सारख्या टोकदार हत्यारांनी छातीत मारून एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना शनिवार 14 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान शिवसेना ऑफिस जवळ, नेहरू चौक, चाकण येथे घडली. वैभव शिंदे या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी शशिकांत दाजी माने (वय 48, कमल पार्क सोसायटी, निघोजे ,ता. खेड) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव संजय शिंदे (रा. श्रीराम सोसायटी, चाकण), अनुज संदीप परदेशी (रा. माळ आळी, चाकण) मयूर तरडे (रा. शेतकरी वाड्याजवळ, महात्मा फुले चौक, चाकण) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा प्रथमेश माने या तरुणाचा खून झाला आहे .त्यांचे मित्र आरोपी क्रमांक एक ते चार यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून स्क्रू ड्रायव्हर किंवा टोच्या सारख्या टोकदार हत्यारांनी छातीत मारून व फरशीने त्याचे डोक्यात मारहाण करून त्याचा खून केला. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे पुढील तपास करत आहेत.

