पुणे , पिंपरी - चिंचवड ,ठाणे सहमहापालिका मध्ये प्रभाग रचनांचे आदेश मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राज्य सरकारने महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले असून अ ब आणि क वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर ,ठाणे, नाशिक, नवी मुंबई ,वसई विरार ,छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली या महापालिकांचा समावेश आहे.
राज्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसानी प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यासंबंधीच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत . मुंबई महापालिकेत एक सदस्य प्रभाग रचना असून जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार आहेत . मुंबई महापालिकेत 227 एक सदस्य प्रभागात रचना करण्यात येणार आहे , तर अन्य महापालिकांमध्ये चार सदस्य प्रभाग रचना असणार आहेत .अ वर्ग महापालिका - पुणे नागपूर , ब वर्ग महापालिका - ठाणे, नाशिक , पिंपरी चिंचवड क वर्ग महापालिका - नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजी नगर, कल्याण डोंबिवली,
ड वर्ग महापालिकांमध्ये तीन ते पाच सदस्य प्रभाग रचना ठरवताना शक्यतोवर सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत .मात्र ज्या ठिकाणी चार सदस्यांचे प्रभाग होत नसतील तेथे एक ते तीन प्रभाग अथवा तीन प्रभाग सदस्यांचा समावेश असेल.ड वर्ग महापालिकांमध्ये -अमरावती , अहिल्यानगर ,अकोला ,कोल्हापूर , सोलापूर, सांगली, मिरज कुपवाड ,मीरा-भाईंदर ,उल्हासनगर , भिवंडी निजामपूर , जळगाव , नांदेड , धुळे ,मालेगाव , लातूर , चंद्रपूर , परभणी ,पनवेल , इचलकरंजी आणि जालना या महापालिकांचा समावेश आहे . orders