मुंबईचा जवान काश्मीरच्या रणभूमीत शहीद!

मुंबई मुंबईतील रहिवासी असलेला आणि मूळचा आंध्र प्रदेशचा मुरली नाईक यांना वीरमरण आले आहे. पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना भारतीय सैन्यदलाचे दोन जवान काश्मीरमध्ये शहीद झाले आहेत .सैन्यातील दुसरे जवान दिनेश शर्मा यांना पुंछ सेक्टरमध्ये वीरमरण आले .

भारत पाकिस्तान सीमेवर सर्जिकल स्ट्राइक नंतर पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने सीमारेषेवर गोळीबार वाढवला आहे, याच दरम्यान 9 मे रोजी पहाटे तीन वाजता झालेल्या गोळीबारात मुरली नाईक शहीद झाले आहेत .मुरली नाईक यांचे बालपण घाटकोपर मधील कामराज नगरच्या झोपडपट्टीत गेले. काही महिन्यापूर्वी पुर्नविकासामुळे त्यांचे घर तुटले आणि कुटुंब परत आंध्र प्रदेशात गेले, पण मुरली मात्र देश सेवेच्या वृत्ताची घट्ट बांधलेले राहिले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करत शहीद मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली. सत्यसाई जिल्ह्याच्या भूमीतून देशासाठी उगवलेला हा सुपुत्र आता अमर झाला आहे.