मुळशी धरण ७६.६७ % भरले ; विसर्ग ८२०० क्युसेक्स पर्यत वाढविला!

मुळशी : मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ५८०० क्यूसेक्सने सुरू असणारा विसर्ग दुपारी ३:०० वाजता ८२०० क्युसेक्स करण्यात आला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. असाच पऊस सुरु राहिल्यास येवा वाढत राहील. परिस्थितीनुसार विसर्ग कमी- जास्त करण्यात येईल अशी माहिती टाटा पॅावरचे सुरेश कोंडूभैरी यांनी प्रसिध्दी माध्यमांना पत्राद्वारे दिली.

तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.