फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

कौटुंबीक वादातून सासूवर चाकूने वार ; जावयाला अटक

कौटुंबीक वादातून सासूवर चाकूने वार ; जावयाला अटक

पिंपरी ; पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सासू आणि मेहुण्यावर चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. पोलिसांनी जावयाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (१६ ऑक्टोबर) रात्री विद्यानगर चिंचवड येथे घडली.

vishnoi divali 1
vishnoi divali 1

आशिष राजु कांबळे (वय २४, शंकर नगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्या सासूने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष याने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला दमदाटी करत मारहाण केली. त्याने पत्नीवर चाकूने वार केले. जखमी विवाहितेला वाचवण्यासाठी आई आणि भाऊ आले असता
आरोपी आशिष याने त्या दोघांवर देखील चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. हे भांडण सुरु असताना आजूबाजूचे लोक जमा झाले. आशिष याने ‘मी या एरियाचा भाई आहे. कोणी मध्ये आले तर त्याला ठार मारेन’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक
पिंपरी ; गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी मावळ तालुक्यातील जांबे येथे करण्यात आली.

विशाल बाजीराव खाडे (वय २२, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार गोविंद डोके यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील जांबे गावात एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जांबे येथील एका चहाच्या दुकानासमोर सापळा लावला. गांजा विक्रीसाठी आलेल्या विशाल खाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५६० ग्रॅम वजनाचा गांजा, एक दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण ८८ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"