फक्त मुद्द्याचं!

17th April 2025
महाराष्ट्र

रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी आमदार सुनिल शेळके यांची नियुक्ती!

रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी आमदार सुनिल शेळके यांची नियुक्ती!

पिंपरी : मावळचे आमदार सुनिल शेळके यांची महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सुनिल शेळके हे मागील काही वर्षांपासून ग्रामीण भागातील भौतिक सुविधा रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेत ठोस उपाययोजना व नवीन प्रकल्प राबवले जातील, मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांन कडून त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार सुनिल शेळके म्हणाले, ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना रोजगार मिळावा आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नव्या योजना आणण्याचा माझा मानस आहे.

viara ad
viara ad

रोजगार हमी योजना समिती
या समितीचे प्रमुख आमदार सुनिल शेळके असून सदस्य म्हणून डॉ. संजय कुटे, डॉ. सुरेश खाडे, अमोल जावळे, विजयकुमार देशमुख, राजेश बकाने, हरिष पिंपळे, विनोद अग्रवाल, महेश चौघुले, राजेश वानखडे, विश्वनाथ भोईर, आमश्या पाडवी, शांताराम मोरे, हिकमत उढाण, काशिनाथ दाते, शंकर मांडेकर, संजय देरकर, नितीन देशमुख, शिरीषकुमार नाईक आणि बापूसाहेब पठारे यांचा समितीत समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या स्वाक्षरीने या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे तसेच इतर वरिष्ठ नेत्यांनी सुनिल शेळके यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"