जिल्हा रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या वाढविण्याचे आरोग्य राज्यमंत्र्यांचे आश्वासन!

आमदार जगताप यांनी लक्षवेधीत उपस्थित केलेला प्रश्नावर आरोग्य राज्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सांगवी येथील पुणे जिल्हा रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या वाढविण्यासोबतच नवजात शिशु अतिदक्षता विभाग (‘एसएनसीयू’) बेड चे संख्या वाढवण्या बाबत आश्वासन आरोग्य राज्यमंत्री. यांनी विधानसभेत दिले.

आमदार शंकर जगताप यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्या म्हणाल्या सांगवीतील पुणे जिल्हा रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या आता ६ वरून १४ करण्यात आली आहे. लवकरच बालकांसाठी एनआयसीयू बेड सुरू करण्यात येतील. सांगवी येथे २०० बेड क्षमतेचे नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव असून, यामुळे जिल्हा रुग्णालयाची क्षमता प्रमाणात वाढणार आहे. रुग्णालयातील कंत्राटी ‘ संस्थेबाबत आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी केली जाईल. तपासात दोषी आढळल्यास संस्थेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार शंकर जगताप यांनी आरोग्य सेवांच्या दुरावस्थेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सांगवी येथील जिल्हा रुग्णालयातील सध्याची स्थिती समाधानकारक नसल्याचे सांगत, त्यांनी तेथील अतिदक्षता विभागाची क्षमता वाढविण्याची गरज व्यक्त केली. विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना आणि लहान बालकांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी ग्रामीण रुग्णालयांमध्ये ‘एनआयसीयू सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी त्यांनी मांडली.
यावेळी या रुग्णालयातील CT SCAN व MRI सारख्या वैद्यकीय सुविधा देणाऱ्या युनिक वेलनेस या बाह्य कंत्राटदार संस्थेबद्दल बोलताना आमदार जगताप यांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. रुग्णालयातील वैद्यकीय चाचण्यांचे कंत्राट मागील वर्षभरापासून ‘युनिक वेलनेस’ या संस्थेकडे आहे. नियमानुसार या सर्व चाचण्या रुग्णालयात होणे बंधनकारक असताना, रुग्णांना विनाकारण MRI करण्याकरिता बाहेर पाठवले जात असल्याची तक्रार त्यांनी केली. ही बाब रुग्णांसाठी आर्थिक आणि मानसिक त्रासाची असून, या गैरप्रकाराला जबाबदार असणाऱ्या संस्थेवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

