फक्त मुद्द्याचं!

6th September 2025
महाराष्ट्र

पुणे,खडकी, कॅन्टोनमेंट बोर्डाचे पुणे महापालिकेमध्ये विलिनीकरण : देवेंद्र फडणवीस

पुणे,खडकी, कॅन्टोनमेंट बोर्डाचे पुणे महापालिकेमध्ये विलिनीकरण : देवेंद्र फडणवीस

 कॅन्टोनमेंट बोर्डांना मिळणार नागरीसुविधांचा लाभ

मुंबई : पुणे, खडकी  कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे महापालिकेमध्ये, औरंगाबाद  कॅन्टोनमेंट बोर्ड छत्रपती संभाजी नगर महापालिकेमध्ये देवळाली व अहमदनगर  कॅन्टोनमेंट बोर्ड स्वतंत्र नगरपालिकामध्ये कामठी  कॅन्टोनमेंट बोर्ड येरखेडा नगरपंचायत मध्ये समाविष्ट होणार आहेत. या  कॅन्टोनमेंट बोर्डाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी आज बैठकीत सांगितले. कॅन्टोनमेंट बोर्डाचे

विधानभवन येथे राज्यातील  कॅन्टोनमेंट मंडळांचे नगरपालिका,महापालिका क्षेत्रात विलिनीकरणाबाबत बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषद सदस्य सिद्धार्थ शिरोळे,सरोज अहिरे,संग्राम जगताप,सुनिल कांबळे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के.एच.गोविंदराज, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, व्ही सी द्वारे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव, जिल्हाधिकारी पुणे,पिंपरी चिंचवड, नाशिक,छत्रपती संभाजीगर,अहिल्यानगर, पुणे दक्षिण कमांडचे संचालक संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी,पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजी नगर,कामठी, अहमदनगर,देहू रोड कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

viarasmall
viarasmall

मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस म्हणाले की, गेली अनेक वर्षे  कॅन्टोनमेंटमंडळ परिसरातील विकास कामांसाठी स्थानिक ठिकाणी मागणी होत असल्यामुळे केंद्र शासनाने नागरी भाग शेजारच्या ,नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रात पुणे,खडकी,देवळाली, छत्रपती संभाजी नगर,कामठी, अहमदनगर, देहू रोड येथे छावणी क्षेत्र आहे.प्रत्येक छावणीसाठी स्वतंत्र परिस्थिती आहे हे लक्षात घेवून काही ठिकाणी थेट महापालिकेत समावेश करणे व काही ठिकाणी नवीन नगरपालिका स्थापन करावी लागणार आहे. या कॅन्टोनमेंटमंडळातील कर, वीज, पाणी आर्थिक प्रकरणे,कर्मचारी यांचे हस्तांतरण ही सर्व प्रकरण केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात यावीत.या  कॅन्टोनमेंटमंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने नागरीसुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होणार आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जिल्हा नियोजन मधून  कॅन्टोनमेंटमंडळांच्या विकासासाठी निधी देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे, खडकी, देवळाली,छत्रपती संभाजी नगर,कामठी,अहमदनगर या  कॅन्टोनमेंटमंडळाचा समावेश झाल्याने जिल्हा नियोजन मधून या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडून मदत करण्यात येईल.संबधित समाविष्ट नगरपालिका आणि महानगरपालिकांनी त्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"