17 लाख रुपये किमतीचे एमडी जप्त ;आरोपीस अटक!

पिंपरी : बेकायदेशीर एका व्यक्तीने सुमारे 17 लाख 91 हजार रुपये किमतीचा 163 मिलिग्रॅम वजनाचा अमली पदार्थ एमडी मॅफेड्रॉन विक्रीसाठी जवळ बाळगला. ही घटना मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास चिखली वडाचामळा, जाधववाडी येथे घडली . आरोपीस अटक करण्यात आली आहे.

प्रकरणी विजय दीपक दौंडकर पोलीस हवालदार ,अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फैजान जहीर अहमद शेख (वय 25, रा. फ्लॅट नंबर 1101, विठ्ठल कॅपिटल, सिल्वर जिम समोर, चिखली, ता. हवेली) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी त्याच्या ताब्यात एकूण 17 लाख 91 हजार रुपये किमतीचा 163 ग्रॅम वजनाचा एमडी मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक मोटरसायकल, एक दोन मोबाईल ,रोख रक्कम मुद्देमाल जप्त करण्यात आला. एमडी ची बेकायदेशीररित्या वाहतूक करताना आरोपीला ताब्यात घेण्यात आले. हा अमली पदार्थ त्याने कोठून आणला याबाबत चौकशी केली असता आरोपी क्रमांक दोन व तीन यांच्याकडून विक्री करता आणल्याचे सांगितले .याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक गोमारे हे पुढील तपास करत आहेत.

