काळेवाडी येथे 2 लाख 65 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त; तिघे जेरबंद!

पिंपरी :अमली पदार्थ गांजा बेकायदेशीररित्या विक्रीकरिता जवळ बाळगल्याने तीन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुमारे 2 लाख 65 हजार 350 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 25 फेब्रुवारी रोजी चार वाजण्याच्या सुमारास रागा हॉटेलच्या विरुद्ध बाजूस हॉटेल पाटीलवाडा कडे जाणाऱ्या सर्विस रोडवर काळेवाडी येथे करण्यात आली.

याबाबत रवी प्रकाश पवार पोलीस शिपाई गुन्हे शाखा युनिट दोन यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रतीक राकेश खैरनार (वय 27,रा. रॉयलसीमा पीजी, मातोश्री बिल्डिंग मुकाई नगर, हिंजवडी), मयूर घनश्याम कपाटे (वय 25, रूम नंबर 53, चौथा मजला, बिल्डिंग नंबर चार, लिंक रोड, अशोक नगर, पिंपरी), अक्षय विजय मंथान (वय 28, रा. दुसरा मजला ए विंग, पियुष पार्क, शिवाजी पुतळ्याजवळ, पिंपरी गाव )असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक याने त्याच्याजवळ 93 ग्रॅम वजनाचा निव्वळ गांजा चार हजार सहाशे पन्नास रुपये किंमत, आरोपी क्रमांक दोन याने त्याच्याजवळ तीस हजार तीनशे रुपये किमतीचा 3.30 ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा अमली पदार्थ जवळ बाळगला. तसेच आरोपी क्रमांक तीन यांनी त्यांचे जवळ दोन लाख तीस हजार चारशे रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा हा अमली पदार्थ विक्रीकरिता जवळ बाळगला. तिन्ही आरोपीकडे मिळून दोन लाख 65 हजार 350 रुपये किमतीचा 93 ग्रॅम गांजा व 26.70 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा बेकायदेशीरपणे मिळून आला आहे. काळेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नलावडे पुढील तपास करत आहेत.

