फक्त मुद्द्याचं!

14th March 2026
गुन्हेगारी

आठ लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त!

आठ लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त!

पिंपरी : बेकायदेशीरपणे एका व्यक्तीने आदेशाचा भंग करून आठ लाख बत्तीस हजार तीनशे रुपये किमतीचा 446 ग्रॅम अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याने जप्त केला. ही घटना गुरुवार 12 मार्च रोजी सव्वा सातशे सुमारास जय हरी अमृततुल्य समोर, गणेश नगर तळवडे येथे रोडच्या कडेला घडली .

viara vcc
viara vcc

याबाबत प्रतीक संभाजी कवडे पोलीस शिपाई ,अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राजेंद्र सुरेश पवार (वय 26, रा. गणेश हाउसिंग सोसायटी, बिल्डिंग नंबर सहा/ तीन, फ्लॅट नंबर 14 , ओटा स्कीम ,निगडी) व बळीराम मोहिते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक याने त्याच्या ताब्यात आठ लाख 32 हजार 300 रुपये किमतीचा 446 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी बेकायदेशीरित्या जवळ बाळगला पोलिसांनी एक विवो कंपनीचा मोबाईल व एक बलेनो कार ताब्यात घेतली. आरोपी क्रमांक एक याने हा गांजा कोठुन आणला व कोणाकडून आणला याची चौकशी करता आरोपी क्रमांक दोन बळीराम मोहिते यांचे नाव त्यांनी सांगितले. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लांडगे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"