फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

गाडी भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण ; चार जणांना अटक

गाडी भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण ; चार जणांना अटक

आळंदी : गाडी भाड्याचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला ट्रान्सपोर्ट मालकाने पैसे देण्यास नकार देऊन शिवीगाळ केली. त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या डोक्यात छोटा सिलेंडर व फरशी मारून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवार 27 जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चिंबळी फाटा न्यू साउथ कार्गो मूव्हर्स ट्रान्सपोर्ट ता. खेड येथील ऑफिसमध्ये घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत आनंद दिलीप कारंडे वय 42, रा. कारंडेवाडी ता. माण, जि. सातारा यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जावेद मोहम्मद शेख (वय 40, रा. काळेवाडी तापकीर नगर, ता. हवेली), शोएब खलील मोमीन (वय 40, रा. 21 22 फुलेनगर, वाई सातारा), राजकुमार रामचंद्र भोसले (वय 25, रा. गावठाण गायगव्हाण, ता. सांगोला जि सोलापूर), सुनील सखाराम राठोड वय 22, रा. ब्राह्मणगाव, ता. जिंतूर, जि. परभणी )अशी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे वाहन चालक असून गाडी भाड्याचे पैसे मागण्यासाठी ते आरोपी क्रमांक एक यांच्याकडे गेले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तुला काय करायचे ते कर असे म्हणून शिवीगाळ केली. आरोपी क्रमांक दोन ते चार यांना वाहतूक कार्यालयावर बोलवून घेतले. आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी यांच्या डोक्यात छोटा सिलेंडर मारून आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीस आज तेरा गेम ही कर देता असे म्हणून फिर्यादी यांच्या डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केले. आम्ही इथले भाई आहोत असे म्हणून त्यांच्या हातातील सिलेंडर हवेत उंचावत जोरजोरात ओरडले .त्यामुळे परिसरातील आजू बाजूला असलेले लोक भीतीने सैरावैरा पळू लागले व दुकाने बंद करून निघून गेले. त्यानंतर पुन्हा आरोपीने हातातील छोटा सिलेंडर फिर्यादीस मारून जखमी केले. याबाबत आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गिरी गोसावी हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"