दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करुन प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात देणार पाणी : अमित शाह

शिर्डी : देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं काम सुरु केलं होतं. त्यांनी जलयुक्त शिवार सुरु केल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. आता या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने ते दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करुन प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्याचं काम करतील असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. शरद पवार अनेक वर्ष देशात मंत्री होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते. मात्र, ते शेतकरी आत्महत्या थांबवू शकले नाहीत असे म्हणत अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
2024 वर्ष हे भाजपसाठी चांगलं राहीलं असल्याचे अमित शाह म्हणाले. तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले आहेत. हरियाणात भाजप तिसऱ्यांदा जिंकली आहे. याची इतिहासात नोदं केली जाईल असे ते म्हणाले. आम्ही थकणारे नाही. महाराष्ट्रात 40 लाख सदस्य बनले आहेत. एकूण दिड कोटी सदस्य बनवायचे आहेत. दिड महिन्यात पुढे जायचं आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहे. विरोधकांना एकही जागा मिळणार नाही याची चिंता करा असेही अमित शाह म्हणाले. सर्वच ठिकाणी भाजप असली पाहिजे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपल्याला विजय मिळवायचाय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला विजय मिळवायचा असल्याचे शाह म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढून एवढं बहूमत आलं आहे. त्यांनी मोठं काम केलं आहे. तु्म्हीही किती मोठं काम केल आहे, देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवलं आहे. खरी शिवसेना आणि सच्ची राष्ट्रवादी याचाही विजय झाला आहे. शरद पवार यांनी राजकारणात जे केलं होतं त्याला 20 फुट दफन करण्याच काम तुम्ही केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जे केलं होत त्यांना अद्दल घडविण्याचं काम तुम्ही केल्याचे शाह म्हणाले.