महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर!

पुणे : सिने दिग्दर्शक निर्माते दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांना जागतिक मराठी अकादमीच्या वतीने मराठी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .गोव्यातील उद्योजक अनिल खवटे यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार जाहीर केला आहे .

नऊ ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत पणजी येथे आयोजित शोध मराठी मनाचा या जागतिक मराठी संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नऊ जानेवारी रोजी संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार असून ज्येष्ठ अनु शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी दिली आहे.

