महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुक; साहित्य संवर्धन आघाडीची घोषणा!

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीतील विविध पदासाठी अर्ज भरलेल्या समविचारी उमेदवारांनी एकत्र येत साहित्य संवर्धन आघाडीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आघाडी स्थापन करण्यात आल्याची माहिती आघाडीच्या उमेदवारांनी पत्रकार परिषदेत दिली. आघाडीच्या वतीने योगेश सोमण अध्यक्षपदासाठी उमेदवार असून डॉक्टर स्वाती महाळंक प्रमुख कार्यवाह पदासाठी आणि प्रदीप निफाडकर कोषाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. दहा पदासह साहित्य संवर्धन आघाडीने पुणे जिल्हा प्रतिनिधी पदासाठी संदीप तापकीर यांना पाठिंबा दिला आहे.

मसापची निवडणूक दहा वर्षानंतर होत असून परिषदेमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आमचा जाहीरनामा आगामी दोन दिवसात प्रसिद्ध केला जाईल .अधिकाधिक मतदान व्हावे ही आमची भूमिका आहे असे सोमण यांनी स्पष्ट केले. निफाडकर म्हणाले की लढाई धमकी विरुद्ध विनंती ,लालूच विरुद्ध प्रतिष्ठा अशी आहे. सध्याची निवडणूक प्रक्रिया घटनेप्रमाणे नाही असा दावा त्यांनी केला.
साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार
स्थानिक कार्यवाह क्रमांक एक : सुनील महाजन
स्थानिक कार्यवाह क्रमांक दोन: हेमंत मावळे
स्थानिक कार्यवाह क्रमांक तीन : सुनेत्रा मंकणी
स्थानिक कार्यवाह क्रमांक चार : प्रसाद मिरासदार
स्थानिक कार्यवाह क्रमांक पाच : कुणाल ओंबासे
स्थानिक कार्यवाह क्रमांक सहा: नितीन संगमनेरकर
स्थानिक कार्यवाह क्रमांक सात: डॉ. गणेश राऊत

